कवी / कवितांचे प्रकार

भेटी

आजच्या भेटी: 14

Feeds

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Subscribe to Kavyanjali New by Email Photobucket

शोध मोहिम

Marathi Typing Download Here or Click Here


follow me on Twitter


tweets!

आकाशी झेप घे रे, पाखरा

आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा

अधिक माहिती»

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा

- जगदीश खेबूडकर

अधिक माहिती

गायक/गायिका: आशा भोसले

गीत - जगदीश खेबूडकर

संगीत - सुधीर फडके

स्वर - सुधीर फडके

चित्रपट - आराम हराम आहे

वर्ष: १९७६

राग - यमन, तिलककामोद, देस (नादवेध)

Powered by Hackadelic Sliding Notes 1.6.3+

Related posts:

  1. अपराध मीच केला
  2. अहो सजना, दूर व्हा
  3. सावळांच रंग तुझा
  4. सख्या रे, घायाळ मी हरिणी
  5. अवेळीच केव्हा दाटला अंधार

Related posts brought to you by Yet Another Related Posts Plugin.

Leave a Reply

 

 

 

You can use these HTML tags

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Comment moderation is enabled. Your comment may take some time to appear.